पुणे – देवगड हापूस आंब्यांची पहिली आवक रविवारी (दि.२६) पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर झाली. पाच पेट्यांपैकी ५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला. तर, त्याखोलाखाल इतर पेट्यांना १५ आणि ११ हजार रूपये याप्रमाणे पेटीला भाव मिळाला.
कोथरूड येथील खरेदीदार ज्योतिराम बीराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा असून मुंबईहुन पुण्यात रविवारी दाखल झाला. टप्प्याटप्प्याने देवगड हापूसचा हंगाम सुरू होऊन, फेब्रुवारीमध्ये नियमित हंगाम सुरू होईल, अशी माहिती आंब्याचे आडतदार युवराज काची यांनी दिली.