पुणे – माहेरहून दागिने, पैसे आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी शुक्रवारी पती आणि सासू यांना अटक केली आहे.
विक्रांत सुनील बेंगाळे आणि त्याची आई (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच दीर विस्मय बेंगाळे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका बेंगाळे (23 , रा. पांडवनगर) हे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वैशाली सोनवणे (48, रा. हडपसर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 जुलै 2021 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान घडला.