पुणे – गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या टोळीस गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 76 हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हेशाखा युनिट एकचे पथक अभिलेखावरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना खब-याकडुन माहीती मिळाली की, पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत आहे. त्यांचेपैकी दोघेजण चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी यशवंत नगर, खराडी, चंदननगर,पुणे येथील बाजारपेठेत येणार आहे.
पोलीसांनी त्याठिकाणी सापळा लावून मोबाईल फोन विकण्यासाठी आलेले मुकेश शिवलाल दिवाकर (21- रा. खराडी पुणे मुळ पत्ता – मुपो जलालपुर जवाहरगंज पोस्ट तिलापुर जिल्हा-कोसंबी उत्तरप्रदेश) व दिपककुमार मोहन जयस्वाल (23 – रा-चंदन नगर चौपाटी, पुणे मुळ पत्ता-मुपो गाव परसोहिया पोस्ट-माथाबाजार जिल्हा – सिध्दार्थनगर उत्तप्रदेश) यांना ताब्यात घेतले.
त्यावेळी त्यांचे ताब्यातुन दोन सॅमसंग , दोन रेडमी , दोन ओपो , दोन एमआय कंपनीचे असे एकुण आठ मोबाईल फोन किंमत 76 हजार रुपयांचे जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे मोबाईल फोन त्यांनी पुणे शहर, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागातुन चोरल्याचे पोलीसांना सांगीतले आहे .त्यांचा एक साथीदार फरार आहे त्याचा शोध चालु आहे. आरोपींकडून चंदन नगर पोलीस स्टेशनकडील तीन, विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील एक असे मोबाईल फोन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे,पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण यांनी केली आहे.