पुणे –शाळेच्या कंपाऊंडलगत दोन टपऱ्यांमध्ये चाललेल्या जुगार अड्डयांवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. यामध्ये दहा मोबाइल आणि रोकड असा 1 लाख 17 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सोमवार पेठेत एका शाळेच्या कपांऊंडलगत दोन टपऱ्यांमध्ये पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
जुगार अड्ड्याचा मालक आप्पा कुंभार (रा. नाना पेठ) हा सुभाष धनवटे, सादिक तांबोळी, सोमेश्वर गायकवाड, विजय बडदे, राजेंद्र बनसोडे हे कल्याण मटका जुगार घेत होते. तर, गजानन लोमटे, विक्रम बनकर, सलिम उस्मान मनसुरी, रमेश कुंडकर, विलास तापकीर, अजित जाधव, संजय बोरा, रतिकांत सोनवणे (रा. रास्तापेठ) हे मटका जुगार खेळत होते. त्यांच्याविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षकप श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत ,बाबा कर्पे,आण्णा माने ,प्रमोद मोहिते,इरफान पठाण,अश्विनी केकाण,पुष्पेंद्र चव्हाण,स्नेहा धुरी यांनी केली आहे.
.