मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील ‘उत्तर सभे’ची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेत त्यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाची गर्जना करत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर भूमिका बदलल्याची टीका करण्यात आली होती. त्याला राज यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार म्हणतात मी भूमिका बदलली. याच शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्दावर काँग्रेस पक्ष सोडला होता. निवडणुकीनंतर लगेचच दोन महिन्यांनी ते काँग्रेसमध्ये गेले आणि केंद्रीय कृषीमंत्री झाले. तुम्ही दोन महिन्यातच भूमिका बदलली. पण तुम्ही मी भूमिका बदलल्याची चर्चा करता, असंही पवारांनी म्हटलं.