पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांकडून 16 लाख 32 हजाराचा चरस जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अमीर मसीउल्ला खान (24, रा.ताडीवाला रस्ता) आणि अतुल गौतम वानखेडे ( 22, रा.ताडीवाला रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी अंमली पदार्थ विक्री करण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यावर पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून केटीएम दुचाकी व मोबाइल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, एस. डी.नरके यांच्या पथकाने केली.