पुणे – तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न व वाहचोरीतील गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. रवींद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (रा- डायस्प्लॉट गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी व अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी हा गुलटेकडी येथे येणार असल्याची खबर सहायक पोलीस निरीक्षक दिपक जमदाडे, पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळली.
त्यानूसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने गुह्यात वापरलेली दुचाकी हि चंदनगर येथून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चोरी संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी यास अटक केल्यानंतर त्याने गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हा सध्या येरवडा कारागृहामध्ये आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव स्वारगेट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, दिपक जमदाडे,पोलीस अंमलदार कुंभार, खोमणे,दळवी,साळवे,कांबळे,शीतकाल, ढावरे, शेख,खेंनाद ,तिटमे यांच्या पथकाने केली आहे.