Pune Crime: पुणे परिसरात ‘सशस्त्र दरोडा’; शेजाऱ्यांची घरं बंद करून दागिने, रोकड लांबविली

पुणे – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडकी गावात सोमवारी (दि.११) रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली. हातात कोयते आणि काठ्या घेऊन घरात शिरलेल्या दोरडेखोरांनी एका शेतकयाच्या घरातून सोन्याचे दागिने, तेलाचे डबे व रोकड असा ६१ हजारांचा मुद्देमाल चोरला. यावेळी कुणाला बाहेर येता येऊ नये, यासाठी दरोडेखोरांनी शेजायांची घरे बाहेरून लावून घेतली होती. माहिती मिळताच लोणीवंâद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे.

याबाबत ५५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,  तक्रारदार शेतकरी असून वडकी गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ राहतात. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोर हातात कोयते व काठ्या घेऊन त्यांच्या घरात शिरले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत तक्रारदार यांना मारहाण केली. यानंतर सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तेलाचे डब्बे व मोबाईल फोन असा ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला.

यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर कुणीही  मदतीसाठी बाहेर येऊ नये, म्हणून दरोडेखोरांनी शेजायांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. दरोडेखोर पसार झाल्यानंतर काही वेळात गावकरी  एकत्र येत दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाहणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.