पुणे – उंड्री परिसरात रहाणाऱ्या एका मुलीच्या वयाच्या तेराव्या वर्षी अपहरण करण्यात आले. त्यानंतर तीच्यावर अत्याचार करत दोन वेळा गर्भपात करण्यात भाग पाडण्यात आले.
या अत्याचार करणाऱ्यास तब्बल 9 वर्षानंतर कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणी बालअत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण सुभाष मोरे(होलेवस्ती, कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत मुलीचे वयाच्या तेराव्या वर्षी सन 2013 मध्ये आरोपी प्रविणने अपहरण केले होते. तेव्हा आरोपी पिडीत मुलीच्या शेजारी रहात होता. त्याने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.
दरम्यान आरोपीने पिडीतेला शेगाव येथील टाकळी हाजी येथे नेऊन अत्याचार केले. त्याने 2015 ते 2021 दरम्यान वेगवेगळया ठिकाणी नेऊन तीच्यावर अत्याचार केले.
यादरम्यान गर्भवती राहिल्यावर तीचा दोनदा गर्भपात केला. यानंतर आरोपीने दुसऱ्याच एका महिलेबरोबर विवाह केला. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गपाट करत आहेत.