पुणे- गेल्या 24 तासांत नव्या करोना बाधितांची संख्या 70 नोंदवण्यात आली आहे. पुणेकरांसाठी ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. याशिवाय संशयितांच्या स्वॅबटेस्टही कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर, दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या घटत चालली आहे. सोमवारी 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या सक्रीय बाधितांची संख्या 1,003 असून यात 164 जणांची प्रकृती गंभीर असून, 216 जण ऑक्सिजनवर आहेत.
आजपर्यंत 9 हजार 65 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4 हजार 675 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या आहेत.