पुणे जिल्हा :शिरूरच्या पूर्व भागात धमकीपत्राचा निषेध

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी
शिरूर तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिक, पदाधिकाऱ्यांतून संतापाचा सूर
निमोणे  – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यास अटक करावी व आमदार ऍड. अशोक पवार यांना ताबडतोब पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पूर्व भागातून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात निवेदन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना देण्यात आले.

यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष रवींद्र काळे, शहराध्यक्ष व शिरूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती मुज्जफर कुरेशी, युवकचे तालुका अध्यक्ष सागर निंबाळकर, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिरूर शहर शिवसेना प्रमुख मयूर थोरात, शिरूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. किरण आंबेकर, युवक अध्यक्ष अमजद पठाण, उरळगावचे ग्रामपंचायत सदस्य रफिक शेख, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद,

शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, शिरूर नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, नगरसेवक मंगेश खांडरे, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्‍वास ढमढेरे, माजी नगरसेवक संतोष भंडारी, रामलिंगचे सरपंच नामदेव घावटे, महिला तालुका अध्यक्षा विद्या भुजबळ, संगीता शेवाळे, श्रृतिका झांबरे, सौदामिनी शेटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष निलेश जाधव, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, दादाभाऊ वाखारे उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले की, आमदार अशोक पवार यांनी जो विकास चालवला आहे, त्या विकासाची लढाई विकासानेच केली पाहिजे. पत्रक लिहणाऱ्यांनी आधी विकास करुन दाखवावा. यावेळी राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष रवींद्र काळे यांनी पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संपर्क करत सर्व घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घालून आरोपीचा लवकरात लवकर शोध लावावा व आमदार अशोक पवार यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.