शिवसेना उपऱ्यांच्या जिवावर चालतेय; भाजपची टीका

मुंबई- भाजपचे जवळपास 15 ते 20 नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेनेने केलेला दावा केवळ फुसका बार आहे, असे भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.

मागील 25 वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठीसुद्धा उमेदवार दिले.

स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोला भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.