पुणे –दिवसभरात 249 करोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, नऊ बाधितांचा मृत्यू झाला, त्यातील 3 जण पुण्याबाहेरील आहेत. तसेच 250 बाधित बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.आजपर्यंत 29 लाख 8 हजार 871 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली.
त्यातील 4 लाख 88 हजार 049 जण बाधित आढळले आहे. त्यातील 4 लाख 76 हजार 909 बाधित बरे झाले आहेत. मात्र 8 हजार 792 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गेल्या 24 तासांत मृत पावलेल्या 6 जणांचा समावेश आहे. सध्या 2 हजार 348 सक्रीय बाधित आहेत. त्यातील 213 जणांची प्रकृती गंभीर असून, 355 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.
ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही अजूनही कमी होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. याशिवाय गंभीर रुग्णांची संख्याही अद्याप कमी होताना दिसत नाही. मात्र या दोन्ही संख्या स्थिर आहेत. दिवसभरात 8 हजार 312 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली.