सातारा -जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 618 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 28 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुदवारी संध्याकाळपर्यंत 599 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसामध्ये आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे. जावळी 19 (9415), कराड 136 (35348), खंडाळा 21 (13191), खटाव 61 (21938), कोरेगाव 62 (19273), माण 30 (14992), महाबळेश्वर 1 (4533), पाटण 19 (9619), फलटण 113 (31318), सातारा 112 (45807), वाई 35 (14459) व इतर 9 (1672). जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख 21 हजार 565 इतकी झाली आहे.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 1 (201), कराड 11 (1054), खंडाळा 1 (170), खटाव 2 (522), कोरेगाव 1 (415), माण 1 (305), महाबळेश्वर 0 (87), पाटण 1 (336), फलटण 4 (536), सातारा 5 (1347), वाई 1 (331) व इतर 0 (73). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5377 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.