पुणे –गेल्या 24 तासांतील नव्या करोना बाधितांची संख्या 200 झाली असून, 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील आहेत. 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 97 हजार 612 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 86 हजार 421 बाधित बरे झाले आहेत. त्यात गुरूवारी डिस्चार्ज मिळालेल्या 200 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 965 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या, 2 हजार 226 सक्रीय बाधित असून, त्यातील 213 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 296 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 8 हजार 865 संशयितांची स्वॅब टेस्ट तर आजपर्यंत 32 लाख 12 हजार 128 स्वॅब टेस्टचा टप्पा शहरात पार झाला आहे.