पुणे – गणेश चतुर्थीनिमित्त शुक्रवारी लसीकरणाला सुट्टी देण्यात आली असून, शनिवारी ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.
गणेश चतुर्थीनिमित्त लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, शनिवारी लसीकरण मोहीम सुरू राहणार असून, त्याचे नियोजन शुक्रवारी दिले जाईल, अशी माहितीही विभागातर्फे देण्यात आली.
केंद्रांवर लसीकरण होत नसले तरी, झोपडपट्टी वगैरे अशा काही विशिष्ट भागांमध्ये लसीकरण सध्या केले जात आहे. याशिवाय बेघर, भिक्षेकरी आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड आदी पुरावे नाहीत त्यांच्याही लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.