पुणे – शहरात आज नव्याने 238 करोना बाधित सापडले असून, मागील आठ दिवसांपासून बाधित संख्या स्थिर आहे. आजचा बाधित दर 2.59 टक्के इतका आहे. बाधित संख्येपेक्षा करोनामुक्तीचे प्रमाण अधिक असल्यामुळे अत्यवस्थ बाधित संख्या दोनशेच्या खाली आली आहे.
दिवसभरात 9 हजार 211 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 29 लाख 86 हजार 492 जणांच्या तपासणीतून 4 लाख 89 हजार 970 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, आज 237 बाधित करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत एकूण 4 लाख 79 हजार करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे आज 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यामध्ये शहर हद्दीतील 5 जणांचा समावेश आहे. सध्या 2,125 सक्रीय बाधित संख्या आहे. त्यामध्ये 198 जण प्रकृती चिंताजनक आहेत.