पुणे – शहरात दिवसभरात 129 करोना बाधितांची नोंद झाली आहे. बरे झालेल्या 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत झालेल्या 34 लाख 17 हजार 003 स्वॅब टेस्टमध्ये 5 लाख 02 हजार 101 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
त्यातील 4 लाख 91 हजार 472 बाधित बरे झाले. परंतु, 9 हजार 046 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या 3 जणांचा समावेश असून, याशिवाय हद्दिबाहेरील 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
एकूण बाधितांमधील 1 हजार 583 बाधित सक्रिय असून, त्यातील 184 बाधितांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 229 जण ऑक्सिजनवर आहेत. तर गेल्या 24 तासांत 7 हजार 562 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.