पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत.
कोविशील्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सीनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, 75 तासांचे अविरत लसीकरणही दोन केंद्रांवर आणखी एक दिवस सुरू ठेवण्यात आले आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दि स्पॉट बुकींगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून, तर 10 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
15 जुलैपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकींग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दि स्पॉट बुकींग होणार आहे. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.