पुणे : राष्ट्रीय एकात्मकता जपण्यासाठी साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपत सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर मधील एकता सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी रक्तदान शिबिराद्वारे दरवर्षी प्रमाणे विधायक गणेशोत्सव सुरू करण्यात आला आहे.
यावेळी, मंडळातील युवकांनी या शिबिरात रक्तदान करत 40 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. इंडियन सेरेलॉजिकल इन्स्टिट्यूट बल्ड बॅंक आणि डॉ. शुभम जगताप यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामदास पिंपळे आणि उपाध्यक्ष बलभिम कांबळे यांनी दिली. एकता मित्र मंडळाकडून दरवर्षी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
त्यात, स्वच्छता मोहीम, मुलांसाठी उपक्रम, स्वयंसेवी संस्थांना मदत करणे असे उपक्रम राबविले जातात. या वर्षीही मंडळाच्या वतीने अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात, मुलांसाठी स्पर्धा, महिलांसाठी उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी दिपक कडबाने यांनीही शिबिराला उपस्थिती लावत या उपक्रमाचे कौतुक केले