पुणे(प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक मिळकतधारकांना, मिळकत कर वेळेवर भरता येत नसल्यामुळे अशा थकबाकीवर महापालिका वर्षाला सुमारे 24 ते 25 टक्के व्याज आकारते. परिणामी ही थकबाकी वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेच्या थकबाकीचे आकडेही फुगत चालले आहेत. तसेच मिळकत करापेक्षा व्याजाची रक्कमच अधिक होत आहे.
हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी महापालिकेकडून पुन्हा एकदा अभय योजना राबवून थकबाकीदारांना व्याजात सवलत द्यावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने मागील दोन वर्षात राबविलेल्या अभय योजनेप्रमाणे चालू आर्थिक वर्षातही अभय योजना राबविल्यास थकबाकी वसूल होईल तसेच महापालिकेचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.
Pune : सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना- मंत्री चंद्रकांत पाटील
त्यामुळे, महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी त्वरित अभय योजना राबविण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. तसेच राज्यशासनाकडेही याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.