मृत महापालिका कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून जाताना पकडले
पुणे (प्रतिनिधी) – लाॅकडाऊन मध्ये लाेकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी धडपड करावी लागत असतानाच, पुण्यात अंमली पदार्थाचे आहारी गेलेल्या दाेन तरुणांनी गांजा आणण्याकरिता बनवेगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या एका मृत सफाई कर्मचाऱ्याचे कपडे घरी आणून ते स्वत:ला व्यवस्थित बसतील असे फिटिंग करुन ते घालून गांजा आणण्याकरिता गेलेल्या सदर तरुणासह त्याचा स्वच्छता कर्मचारी बनून गेलेल्या साथीदारासह पाेलीसांनी पकडले आहे.
ऋषी रविंद्र माेरे (वय-20) आणि सागर चंद्रकांत सुर्वे (25, दाेघे रा.पर्वती,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. त्यांच्या विराेधात सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात पाेलीस हवालदार आर.बी.मुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.