पुणे-बारामती लोकसभा; आता सोशल मीडियाकडे लक्ष

पुणे – पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी जाहीर प्रचाराची मुदत रविवारी संपली असली, तरी आता मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियातून प्रचाराचा धुमाकूळ घातला जाण्याची शक्‍यता आहे. सोशल मीडियातील मेसेज तसेच माहितीवर कोणत्याही स्थितीत नियंत्रण ठेवले शक्‍य नसल्याने उमेदवारांचा प्रचार आता या माध्यमातून पुढील काही तास केला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दरम्यान, निवडणुकीसाठी उमेदवार असलेल्या तसेच स्टार प्रचारकांनाही कोणत्याही स्थितीत सोशल मीडियात लाइव्ह तसेच संदेशाद्वारे आपला प्रचार करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्यातही प्रामुख्याने फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍपद्वारे मोठ्या प्रमाणात मेसेजची देवाणघेवाण केली जात आहेत.

त्यातच अशा ग्रूपवर तसेच ब्रॉडकास्ट ग्रूपवर एकाच वेळी शेकडो जणांशी संवाद साधता येत असल्याने माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी त्याचा मोठा वापर होत आहे. याचाच फायदा घेत उमेदवारांची माहिती, माहिती पत्रके, वोटर स्लीप अशी माहिती लिंकच्या स्वरूपात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे एका बाजूला जाहीर प्रचार बंद असला, तरी दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरही प्रचाराने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही तास हा प्रकार आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.