कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये काल बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत. त्यानंतर आता श्रीलंकेत आज मध्यरात्री पासून आणीबाणी लागू केली जाणार आहे.
श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये काल साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यामुळे देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेन यांनी केली आहे.
दरम्यान, आज कोलंबोतील एका चर्चजवळ व्हॅनमध्ये एक स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाल्याचे समजते. तर थोड्या वेळांपूर्वीच कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर पोलिसांना तपासणी दरम्यान ८७ बॉम्ब डिटोनेटर सापडले आहेत.