शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा खणखणणार
पुणे – करोनाच्या दोन वर्षांचे संकट मागे टाकून आता नवे शैक्षणिक वर्षातील शाळा बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर, करोनामुळे शांत झालेल्या शाळांच्या भिंती पुन्हा बोलक्या होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर शाळांमध्ये किलबिल भरणार असून, शिक्षकांमध्येही उत्साहाचे
वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वागताबाबत नियोजन करण्यासाठी शाळा स्तरावर बैठकांचे सत्रही राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यासाठी शाळांनी निश्चयही केला. गुलाब पुष्प, पेढे, चॉकलेट व इतर खाऊ, शैक्षणिक साहित्य देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेविषयी आस्था निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांची शाळांमधील उपस्थिती नियमित रहावी यासाठी चैतन्यमय वातावरणही निर्माण करावे लागणार आहे. येरवडा येथील अखिल रामनगर मित्र मंडळाच्या वतीने
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या वेशभूषेद्वारे शिक्षणाचे महत्त्व कायम
ठेवण्यासाठी कर्नल यांग प्राथमिक शाळेत स्वागत करण्यात येणार आहे.
पुस्तके आणि गणवेश वाटप
पहिले ते आठवी पर्यंतच्या अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहेत. याअंतर्गत 82 हजारांहून अधिक शाळांना 5 कोटी 38 लाखांहून अधिक पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करण्यात आले आहेत.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी, दर्जेदार पद्धतीने करावे. याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे लागणार आहे.
– सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी, दर्जेदार पद्धतीने करावे. याबाराज्यातील शाळा सुरू होत असून अनेक बालकांचे पहिले पाऊल औपचारिक शिक्षण प्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतीयुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरूची वाढणार आहे. करोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शालेय शिक्षण विभागाने बालकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सर्व मिळून या बालकांचा प्रवेशोत्सव साजरा करावा.
– – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री