पुणे – भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या पादचारी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील सिद्धार्थनगर समोरील रस्त्यावर घडला. सुभाष सुरेश जाधव (वय ३१, रा. आनंदवाडी, लातूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमंलदार कपील भाकरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष मूळचा लातूरमधील आनंदवाडीचा होता. कामानिमित्त तो येरवड्यात राहत होता. १२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास सुभाष सिद्धार्थनगर समोरील रस्त्यावरून जात असताना, अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुभाषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.