पुणे -शहरात गेल्या चोवीस तासांत 243 करोना बाधित आढळले असून, दिवसभरात 208 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील चार रुग्णांसह 6 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हद्दीबाहेरील बाधित मृतांची संख्या दोन आहे. शहरातील सक्रीय रुग्णसंख्येतही वाढ झाली असून, ती 2 हजार 265 वर पोहोचली आहे.
अजूनही ही संख्या जास्त असल्याने चिंता कायम आहे. सक्रीय बाधितांमधील 204 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 279 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्यांची संख्याही वाढली आहे.
आतापर्यंत शहरात 4 लाख 95 हजार 586 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 84 हजार 395 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 926 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चोवीस तासांत 7 हजार 840 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.