‘भली माणसं’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जेष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील यांची ११ वी कादंबरी

इस्लामपूर – कामेरी (ता वाळवा) येथील जेष्ठ साहित्यिक , कादंबरीकार दि.बा.पाटील यांच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए भाग ३ साठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेल्या ” बाबा मास्तर” या व्यक्ती चित्राचा समावेश असणाऱ्या” भली माणसं “या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पेठ ता वाळवा तेथील तीळ गंगा साहित्य सम्मेलनाच्या व्यासपीठावर वाळवा विभागाचे प्रांत अधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दि बा पाटील यांचा ” भली माणसं “हा व्यक्ती चित्रणांचा संग्रह असून या पुस्तकातील बाबा मास्तर या कथेचा नुकताच शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.

दि .बा. पाटील यांनी आत्तापर्यंत आपल्या खास ग्रामीण शैलीत ११ कादंबऱ्या,३ कथासंग्रह १ व्यक्ती चित्र लिहिले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेल्या “मुलखा वेगळी माणस” या पाठ्य पुस्तकात दि. बा पाटील यांच्या “बाबा मास्तर”या व्यक्तीचित्रा सह नामवंत लेखकांच्या साहित्या चा समावेश आहे” मुलखा वेगळी माणस ” या पाठ्य पुस्तकातून विद्यार्थ्यांना ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे आकलन होणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि कौटुंबिक भावविश्व अभ्यासता येणार आहे.बी ए भाग -३ साठी निवड झालेले “बाबा मास्तर” या व्यक्ती चित्र त्यांच्या “भली माणस”यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार ,जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी, कवी आनंद हरी कुलकर्णी, मेहबूब जमादार ,सर्जेराव जाधव, पंडित लोहार ,एच एस गिरीगोसावी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.