काऱ्हाटी, (वार्ताहर) – सुपे (ता. बारामती) येथे पायल ढमे लिखित एक पाऊल स्वप्नांकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील समाजातील विविध समस्या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकाच्या माध्यमातून पायल ढमे यांनी केली आहे.
यावेळी सुपे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच जीवनसाधना फाउंडेशनचे अध्यक्ष जयराम सुपेकर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कवी हनुमंत चांदगुडे होते. यावेळी पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, सुपेचे सरपंच तुषार हिरवे, लिलागुलाब हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद वाबळे, मैत्री पब्लिकेशनचे दयानंद कनकदंडे, सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त प्रकाश चांदगुडे, गोरक्ष मोहिते,
स्नेहदित्य इंटरप्राईजेसचे आकाश डेंगळे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक वैभव भापकर, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्रा. कोळी व प्रा. समगिर, प्रा. मच्छिंद्र गिरमे, उपसरपंच नयना जगताप, ईश्वरी जगताप, अतुल ढम, कासुबाई जगताप, विजय ढमे, मयुरी जगताप, श्रेयश फुलपगार, नेहा फुलपगार, लक्ष्मण जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.