आरोग्य खात्याच्या बजेट अन् भरतीवरून मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली असून राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरादार टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे. करोनाशी लढण्याचा ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कोरोना सारखं संकट असूनही राज्य सरकारनं आरोग्य खात्याचं बजेट वाढवलं नाही. राज्य सरकारनं 4 मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, त्यांनी तेव्हापासून काहीच पावलं उचलली नाहीत. हे सरकार मे 2020 पासून नोकरभरती करु शकलं नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.

दरम्यान सर्व आरोग्य सुविधा संदर्भात तातडीने आणि नव्यानं आखणी करण्याची आवश्यकता आहे, मुनगंटीवार यांनी म्हटलं. सरकारने आता लेखानुदान मांडावे आणि त्यानंतर बजेट जुलैमध्ये अधिवेशनात मांडावे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या केसवरून सरकारवर निशाणा साधला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.