पुणे – सध्या क्रिकेट वर्ल्डकप (worldcup 2023) सुरु आहे. क्रिकेट प्रेमींसाठी वर्ल्डकप म्हणजे एखाद्या सनापेक्षा कमी नाही. नुकतंच या वर्ल्डकपमधील एका मॅचमुळे पिंपरी चिंचवडमधील एक पोलीस अधिकारी चक्क करोडपती झाल्याचे समोर आले आहे.
सोमनाथ झेंडे (Somanath zende) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. मंगळवारी (दि.१०) झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंडच्या मॅचवर पहिल्या क्रमांकाचे अर्थात तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. (psi Somnath Zende won 1.5 crores on Dream 11)
ऑनलाइन गेम Dream 11 मध्ये सोमनाथने 1.5 कोटी रुपये जिंकले, त्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते Dream 11 मध्ये टीम लावत होते. अशात लावलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांचे नशीब चमकले. ((Dream 11) winner)
सोमनाथ झेंडे 1.5 कोटी रुपये जिंकलेले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर 1 कोटी 5 लाख इतकी रक्कम मिळणार असल्याचे समजते. अशात त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Psi somanath zende win 1.5 CR)