आगरतळा – शिक्षणाला वयाचं बंधन नसत आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यात आपल्या आवडीचे विषय शिकू शकतो. असेच काहीसे आगरतळा येथे घडले आहे. 53 वर्ष वय असलेल्या शिला राणी दास यांनी शिक्षणाला वयाचे बंधन नसल्याची म्हण खरी केली आहे. विशेष म्हणजे शिला राणी दास त्यांच्या दोन मुलींसह त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाची (TBSE) परीक्षा त्यांनी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्रिपुरा बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल ६ जुलै रोजी जाहीर झाला आहे. शिला राणी दास यांनी 10वी बोर्डाची परीक्षा दिली आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी 12वीची परीक्षा दिली. त्यांची मुलगी जयश्री दास (त्रिपुरा बोर्ड परीक्षा 2022) म्हणाली की, ‘माझी आई 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही त्यांना नेहमीच प्रेरणा दिली, त्यांच्या अभ्यासात मदत केली, त्यांनी मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण केली.’
त्रिपुरा बोर्ड निकाल 2022 मध्ये ‘इतके’ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
त्रिपुरा बोर्डाचा 10वी-12वीचा निकाल 6 जुलै रोजी जाहीर झाला आहे. 10वी परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 86.18 इतकी आहे. त्याचवेळी 12वीची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.46 इतकी आहे. बोर्डाच्या निकालाची लिंक वेबसाईटवर सक्रिय करण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. दिपायब देबनाथने त्रिपुरा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. TBSE 12वी आणि TBSE 10वीचे निकाल दुपारी 12 वाजता जाहीर झाले आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर TBSE निकाल 2022 पाहू शकतात.