मुरादाबाद – उत्तर प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर पोलीस अकादमीच्या मैदानात सोमवारी सकाळी 72 डेप्युटी एसपींचे पासिंग आऊट परेड झाले. यामध्ये 19 महिला डेप्युटी एसपींचाही समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या डीएसपी वडिलांना सॅल्यूट करत आहे. या फोटोने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली असून लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
Proud father getting salute from the proud daughter…
Apeksha Nimbadia, PPS (Dy SP, UP Police) passed out from Dr BR Academy, UP Police, Moradabad. Father- APS Nimbadia, DIG ITBP (A 3rd gen officer in Uniform) & mother- Bimlesh Nimbadia blessed Apeksha at the Parade. pic.twitter.com/E1dCEf4uJ8
— HWWA – Himveer Wives Welfare Association (@HwwaWives) November 1, 2021
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये यूपी पोलिस डेप्युटी एसपी अपेक्षा निंबाडिया तिच्या वडिलांना सलाम करताना दिसत आहेत. तीचे वडील निंबाडिया हे आयटीबीपीचे डीआयजी एपीएस आहेत. यानंतर डीआयजी वडिलांनीही मुलीला सॅल्यूट करून प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल आशीर्वाद दिले.
कोण आहे अपेक्षा निंबाडिया?
अपेक्षा निंबाडिया यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील आहे. अपेक्षाने ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बी.टेक उत्तीर्ण केले आहे. याशिवाय 2018 मध्ये तीने NET JRF देखील उत्तीर्ण केले आहे. अपेक्षाचे आजोबा वानी सिंग हे जाट रेजिमेंटमधून मानद कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते.
#APPolice1stDutyMeet brings a family together!
Circle Inspector Shyam Sundar salutes his own daughter Jessi Prasanti who is a Deputy Superintendent of Police with pride and respect at #IGNITE which is being conducted at #Tirupati.
A rare & heartwarming sight indeed!#DutyMeet pic.twitter.com/5r7EUfnbzB
— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) January 3, 2021
यापूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सर्कल इन्स्पेक्टर श्याम सुंदर, राज्य पोलिस सेवेत डीएसपी म्हणून तैनात असलेल्या त्यांची मुलगी जेसी प्रशांतीला सलाम करताना दिसले. आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर वडील आणि मुलीचा हा मनमोहक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता हा उत्तर प्रदेशातील मुलगी आणि वडिलांचा फोटो सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकत आहे.