वाघोली- आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत समृद्धी सचिन खांदवे हिने 43 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवले. दिल्ली याठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिची निवड झाली. तिला औरंगाबादचे जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे यांच्या हस्ते मेडल व व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
समृद्धीच्या नेत्रदीपक यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच शांताराम कटके, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कमलाकर सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, महेंद्र भाडळे आदींनी अभिनंदन केले आहे.