‘वॉर’ची बॉक्‍स वेगवान घोडदौड सुरूच

मुंबई – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ऍक्‍शन पॅक्‍ड “वॉर’ची बॉक्‍स ऑफिसवरील वेगवान घोडदौड सुरूच आहे. 2 ऑक्‍टोबरला रिलीज झाल्यावर वॉर चित्रपटाने आतपर्यंत बॉक्स ऑफीसवर तब्बल 16 विक्रम मोडले आहेत. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई 291 कोटी रुपये इतकी झाली असून रविवारपर्यंत हा चित्रपट 300 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

दरम्यान, चित्रपटातील हृतिक रोशन आणि टायगरचे स्टंट प्रेक्षकांना खूपच आवडले आहेत. या दोघांशिवाय आशुतोष राणा आणि वाणी कपूर हे देखील चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.