पुणे – प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा थरार बुधवारपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे गेली दिड वर्षे प्रो-कबड्डी लीगला मुकलेल्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या संघांच्या लढती पाहाण्याती संधी मिळणार आहे.
या लेखात प्रो-कबड्डी लीगमधील मोठा चाहतावर्ग लाभलेल्या पुणेरी पलटण संघाच्या प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. गेल्या सात मोसमात पुणेरी पलटनने त्यांच्या कामगिरित अनेकवेळा चढ-उतार पाहिला आहे. संघांत उत्तोमोत्तम खेळाडू असूनही त्यांना आजपर्यंत विजेतेपदाला
गवसणी घालता आलेली नाही. मात्र, पलटनने स्पर्धेच्या पाचव्या हंगामत सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली पण विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. गेल्या सात हंगामातील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने यंदा पुणेरी पलटन मैदानात उतरेल.
पुणेरी पलटनची गेल्या सात हंगामातील कामगिरी
1. प्रो-कबड्डी लीगला 2014 मध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या या पहिल्या हंगामात 8 संघांनी भाग घेतला होता. पुणेरी पलटणला या हंगामात 14 पैकी केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला.
2. स्पर्धेच्या दुसर्या सत्रातही पुणेरी पलटणची कामगिरी निराशाजनक झाली. या हंगामात पुणेरी पलटणने 14 सामन्यांपैकी 11 सामने गमावले. त्यांना केवळ 2 सामने जिंकता आले तर, एक सामना अनिर्णित राहिला.
3.पुणेरी पलटणने प्रो-कबड्डी लीगच्या तिसर्या सत्रात लौकिकाला साजेशे पुनरागमन करत 16 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले, तर 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. 3 सामने अनिर्णित राहिले. या हंगामात गुणतालिकेत संघ तिसर्या क्रमांकावर राहिला.
4. चौथ्या सत्रात पलटणने समाधानकारक कामगिरी करत 16 पैकी 7 सामने जिंकले आणि 7 सामने गमावले. दोन सामने अनिर्णित राहिले. यावेळी संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला.
5. पुणेरी पलटणसाठी प्रो-कबड्डी लीगमध्ये पाचवा हंगाम सर्वोत्तम ठरला. या हंगामात त्यांनी एकूण 24 सामने खेळत 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर केवळ 8 सामन्यात पराभव पत्करावा लागला. या कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटणने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. मात्र त्यांना?पण विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली.
6. गेल्या काही हंगामात समाधानकारक कामगिरी करणार्या पुणेरी पलटणचा खेळ 6व्या हंगामात पुन्हा एकदा घसरला. पलटणला या हंगामातील 22 पैकी फक्त 8 सामन्यांमध्ये विजय मिळाला. 12 सामने गमवावे लागले तर दोन सामने अनिर्णित ऱाखण्यात त्यांना यश आले.
7. अनेक उत्तोमोत्तम खेळाडूंचा भरणा असूनही पुणेरी पलटण सातव्या हंगामात शेवटच्या स्थानी राहिला. यातील 22 सामन्यांपैकी केवळ 7 सामन्यात पलटणला विजय मिळवता आला, 12 सामन्यांत पराभव पत्करावा लागला तर, तीन सामने अनिर्णित राहिले.