Bengaluru Bulls vs Tamil Thalaivas, Pro Kabaddi League 2023-24 (Hyderabad) : – प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या लढतीत तमिळ थलैवाज संघाने बंगळुरु बुल्स संघावर ४५-२८ अशी मात केली. या विजयाच्या जोरावर तमिळ संघाने यंदाच्या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. नरेंद्र होशियार व अजिंक्य पवार हे दोघे तमिळ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरले. थलायवासचा हा 14 सामन्यांमधला सलग पाचवा आणि तिसरा विजय आहे. मात्र, ते पूर्वीप्रमाणेच गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहेत.
அல்வா எடு கொண்டாடு 😉
17 புள்ளிகள் வித்தியாசத்தில் தரமான ரைவல்ரி வெற்றி இது 😍
இன்றைய ஆட்டம் எப்படி மக்களே? 😎#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvCHE #BengaluruBulls #TamilThalaivas pic.twitter.com/IZqcw5brim
— ProKabaddi (@ProKabaddi) January 21, 2024
या सामन्यात पहिल्या सत्रात पहिल्या मिनिटापासून तमिळ संघाने वर्चस्व राखले. पहिले सत्र संपले तेव्हा तमिळ संघाने २५-१४ अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यांच्या अजिंक्य पवारने ९ तर नरेंद्र होशियारने ६ गुण मिळवताना रेड गुणांचीही कमाई केली. टॅकलमध्येही तेच १० गुण मिळवताना सरस ठरले. बंगळुरु संघाच्या अक्षित व सुशीलनेही चांगली लढत दिली. मात्र, टॅकल गुणांमध्ये ते कमकुवत ठरले. पहिल्या सत्रातच तमिळ संघाने बंगळुरुची बचाव फळी कमजोर ठरवताना सातत्याने रेड गुणांची कमाई केली.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर अक्षितने बंगळुरु संघाची गुणसंख्या वाढवली परंतू तमिळ संघाने आपली आघाडी कायम राखली. या सत्रात अक्षितने तमिळ संघाच्या खेळाडूंवर एकक्षण मोठे दडपण आणले होते. नरेंद्र व अजिंक्य यांनी सातत्याने आक्रमण करताना बंगळुरू संघाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. तमिळ संघाने रेड गुणांचा धडाकाच लावला व तब्बल २५ गुणांची कमाई केली.
अक्षित व भरत यांनी कडवी लढत दिली. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. नरेंद्र, अजिंक्यसह सागर व साहील यांनीही बंगळुरुच्या खेळाडूंच्या यशस्वी चढाया केल्या व संघाच्या विजयात मोलाच वाटा उचलला. अक्षितने १२ गुण मिळवत बंगळुरुकडून तमिळ संघाला चांगले आव्हान दिले होते. मात्र, पहिल्या सत्राप्रमाणे दुसरे सत्र देखील तमिळ संघाच्याच वर्चस्वाचे ठरले व अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला.