मुंबई – प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही सिरीज लवकरच ऍमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे. प्रियांका सध्या तिच्या सीरिजचे विविध ठिकाणी प्रमोशन करत आहे. नुकतीच तिने तिचा पती निक जोनसच्या न्यूयॉर्कमधील म्युजिक कॉन्सर्टला हजेरी लावली.यावेळी तिने आपल्या मित्र परिवारासह कॉन्सर्ट एन्जॉय केल्याचे पाहायला मिळाले.
या कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ निक आणि प्रियांकाच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा निकच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहमीप्रमाणेच ती अतिशय सुंदर दिसली आहे. मैफिलीत या अभिनेत्रीसोबत सिटाडेल या सीरिजचे काही टीम मेंबर देखील उपस्थित होते.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये निक स्वतः स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी प्रियांकाला पती निकसाठी सपोर्ट करताना पाहून फॅन्स देखील खुश झाले आहेत. अनेकांनी याबाबत प्रियांकाचे कौतुक देखील केले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. ‘देवा.. अशी बायको सगळ्यांना दे’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे तर दुसऱ्या एकाने ती नेहमीच त्याला चेअर करते असं म्हंटल आहे.
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मेट गालामध्ये सहभागी होणार आहे. 2023 मेट गाला 1 मे रोजी मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जाईल. त्यावेळी त्यासाठी प्रियांका देखील हजार राहणार असल्याचं म्हंटल जात आहे.