माधुरीच्या ऑनलाईन डान्स ट्युटोरियलचे प्रियांकाकडून कौतुक

माधुरी दीक्षितने आपल्या फॅन्ससाठी ऑनलाईन डान्स ट्युटोरियल सुरू केले आहे. माधुरी दीक्षितच्या या डान्स ट्युटोरियलचे प्रियांका चोप्रा जोनासने कौतुक केले आहे. ही एक खूपच चांगली सुरुवात आहे, अशा शब्दात प्रियांकाने माधुरीच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विशेषतः लॉकडाऊनमुळे घरात अडकून बसलेल्यांसाठी ही एक चांगली संधी आहे, असे प्रियांकाने म्हटले आहे. आपण सगळेच जण घरामध्ये अडकून पडलो आहोत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनीच आपला दृष्टीकोन सकारात्मक राखायला पाहिजे. त्यासाठी डान्स हा एक चांगला पर्याय असू शकतो, असे प्रियांकाने म्हटले आहे.

माधुरी दीक्षितने “लर्न मुव्ह, शेअर मुव्ह’ नावाने हा डान्स उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये ती ट्‌विटरवर डान्सचे व्हिडीओ शेअर करते आहे. “डान्स विथ माधुरी’ या आपल्या ऑनलाईन डान्स ऍकेडमीतील काही व्हिडीओ फॅन्सना आनंद देतील आणि मोकळ्या वेळात काही विधायक, कलात्मक शिक्षण घेण्याची संधीही मिळेल, असे माधुरीने आपल्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे. माधुरीचे 1 ते 30 एप्रिलदरम्यानचे दोन महत्वाचे डान्स व्हिडीओ देखील वेबसाईटवर फ्री अपलोड केले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.