प्रियांका आणि दिल्लीचं खान पान

बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपला स्वतःचा करिष्मा सिद्ध करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या दिल्लीमध्ये असून तेथील खानपानाचा मनसोक्‍त आनंद लुटत आहे. द व्हाइट टायगर या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती दिल्लीला आलेली आहे. दिल्लीत जिभेचे चोचले पुरवत वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारतानाचे प्रियांकाचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच लोकप्रिय होत आहेत. यामध्ये पान खाताना टिपलेली प्रियांकाची मुद्रा युजर्सनी अधिक लाईक केली आहे. प्रियांकाने या फोटोखाली सेट लाईट, पान टेस्टिंग असं लिहिलं आहे.

भुऱ्या रंगाच्या हुडी स्वेटरमधील प्रियांकाच्या चेहऱ्यावरील भावना पाहूनच तिला दिल्लीतील या पानाचा किती मनसोक्‍त आनंद झाला आहे याची प्रचिती येते. पान खाण्यापूर्वी प्रियांकाने दिल्लीतल्या चांदनी चौकातील दौलत की चाटमध्ये जाऊन जिव्हातृप्ती केली. त्यानंतर तिने पान खाऊन मुखशुद्धी केली. प्रियांकाच नव्हे तर तिची बहीण परिणीती चोप्रादेखील दिल्लीला गेल्यानंतर आवर्जून पान खाते. गेल्या जुलै महिन्यामध्ये परिणीती आणि सिद्धार्थ मल्होत्रा जबरिया जोडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी या जोडगोळीने कनॉट प्लेस या भागातील एका दुकानात फायर पानाचा आस्वाद घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.