पश्चिम बंगालमधील चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असणारा जिशु सेनगुप्ता हा शकुंतला देवी-ह्युमन कॉम्प्युटर या आगामी चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर एका वेगळ्या रुपात येणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री विद्या बालनच्या नवऱ्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. बॉलीवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या बायोपिक लाटेतील हा एक बहुचर्चित चित्रपट आहे.
जिशु सांगतो की, या चित्रपटात विद्या बालनसोबत काम करण्यासाठी आणि परितोष बॅनर्जीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे आणि काही सिन्स पूर्णही झाले आहेत. जिशु सांगतो की, विद्यासोबत काम करणे हा एक मजेदार अनुभव असतो.
सेटवर जेव्हा ती आपल्या अवतीभवती असते तेव्हा एकही क्षण बोअर झाल्याचा फील येत नाही. विद्याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक अनु मेनन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही उत्तम राहिला. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईमध्ये सध्या सुरू आहे.