मावा अड्ड्यावर छापा

काटवन खंडोबा येथे अन्न औषध प्रशासनाचा छापा
नगर –
शहरातील काटवन खंडोबा येथील मावा बनविणाऱ्या आड्ड्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकूण 2 लाख 57 हजार 320 मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दि. 11 जून रोजी ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, दि.17 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुटका बनविण्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू, सुपारी मावा अशा प्रकारे प्रतिबंधीक अन्नपदार्थांचे उत्पादन साठा व विक्री बंदी असल्याचे महिती असूनही सदरचे अन्नपदार्थ हे मानवी आरोग्यास हनिकारक आहे. याची जाणीव असतांनाही महारूफ अजिज शेख (वय.21 रा. गाझी नगर, काटवन खंडोबा) याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विक्री केली आहे. त्यानूसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधूकर पवार यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.