वाराणसी – नेपाळचे पंतप्रधान सेर बहादुर देउबा यांनी आज वाराणसीमध्ये प्रसिद्ध कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देउबा यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आरजू राणा देउबा या देखील याप्रसंगी उपस्थित होत्या. उत्तर प्रदेशचे मुक्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दाम्पत्याचे लाल बहादुर शास्त्री विमानतलावर स्वागत केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज आणि नेपाळचा राष्ट्रध्वज घेऊन देउबा दाम्पत्याचे स्वागत केले.
त्यानंतर देउबा यांनी कालभैरव मंदिरात आणि काशी विस्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते. नेपाळच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पु÷पपाकळ्यांची उधळण करत डमरू वाजवून पारंपारीक नृत्य सादर केले.
देउबा दाम्पत्याने कासी विश्वनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला आणि काशी विश्वनाथ मंदिरावर आधारलेला एक माहितीपटही बघितला. ते ललिता घाट येथील पशुपतीनाथ मंदिरालाही भेट देणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात ते पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले. त्यानंतर देउबा यांची ही पहिलीच भारत भेट आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी शुक्रवारी ते नवी दिल्लीत दाखल झाले.