अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम जन्मभूमी येथे राम ललाचे दर्शन घेतले. तात्पुरत्या उबारण्यात आलेल्या राम ललाच्या मंदिरात पंतप्रधानांनी राम ललाची पूजा आणि आरतीही केली. तेथे दीपोत्सवाचे प्रतिक म्हणून दीप प्रज्वलनही त्यांनी केले. मंदिराच्या प्रमुख पुरोहितांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी राम ललासमोर देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्व देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थनाही केली. राम जन्मभूमी मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना राम मंदिर उबारणीच्या कामाच्या प्रगतीबाबतची माहितीही याप्रसंगी दिली.
जन्मभूमि मम पुरी सुहावनि।
उत्तर दिसि बह सरजू पावनि॥
अयोध्या की सरयू आरती में शामिल होने का सौभाग्य मिला। pic.twitter.com/iR9V6A5bFB
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2022
त्यानंतर अयोध्येत शरयू नदीच्या काठावरील दीपोत्सवाला पंतप्रधान उपस्थित राहिले. पंतप्रधानांच्या हस्ते शरयू नदीची आरती देखील करण्यात आली. शरयू नदीच्या किनारी “राम की पैदी’ या कार्यक्रमांतर्गत भव्य लाईट ऍन्ड म्युजिक शो आयोजित केला गेला होता. रामकतेवरील विविध प्रसंग साकारणाऱ्या नृत्य कलाविष्कार याप्रसंगी सादर करण्यात आले. त्यानंतर शरयू किनाऱ्यावर भव्य दीपोत्सव आयोजित केला गेला.
अयोध्या की इस पावन धरती पर मुझे भगवान श्री रामलला की पूजा-अर्चना का सौभाग्य मिला। मैंने राष्ट्र की प्रगति और समस्त देशवासियों की कुशलता की कामना की। pic.twitter.com/0cg7gz34lf
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2022
तब्बल 15 लाख पणत्यांनी सरयू नदीचा किनारा उजलून गेला होता. या भव्य दीपोत्सवासाठी 22 हजार स्वयंसेवकांनी नियोजन आणि तयारी केली होती. अयोध्या सहरातील महत्वाच्या ठिकाणीही दीपोत्सवाच्या निमित्ताने पणत्या ठेवण्यात आल्या होत्या. दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी राम जन्मभूमीवरील नियोजित राम मंदिराचे भुमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. त्यानंतर प्रथमच त्यांनी राम जन्मभूमीला भेट दिली.