सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. दरम्यान, आज सकाळपासून सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वसामान्यांनी त्यांचे अंमित दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अंतिम दर्शनावेळी पंतप्रधानांना आपले अश्रु अनावर झाले. यावेळी त्यांनी सुषमाजींच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.

उत्तम वक्‍त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वांनी त्यांचे आज अंतिम दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक होताना दिसले. तसेच त्यांनी सुषमा स्वराज यांच्या कुटूंबियांचे सांत्वनदेखील केले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीदेखील सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.