सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील ‘सुसंस्कृत’ आणि ‘कर्तृत्ववान’ व्यक्तिमत्व – राज ठाकरे

नवी दिल्ली – उत्तम वक्‍त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वांनी त्यांचे आज अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे ट्विट केले की,’सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.’

Leave A Reply

Your email address will not be published.