राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आणि ‘बिग बॉस 15’चे वाईल्ड कार्ड स्पर्धक ‘अभिजीत बिचुकले’ करोनाच्या विळख्यात

मुंबई – बिग बॉस म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणाऱ्यांची जत्रा.. इथे साळसूद किंवा नॉन ग्लॅमरस माणसांना अजिबात एन्ट्री मिळत नाही… इथे तुम्ही जितके डँबिस… तितके हिट… असंही समीकरण आहे. आणि या समीकरणाला साजेसा असा एक माणूस नुकतचा हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केला आहे.

हा कुणी साधा-सुद्धा माणूस नसून ही एक अष्टपैलू व्यक्ती आहे. असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ यांनी आता सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस 15’ मध्ये एन्ट्री केली आहे.

परंतु, आता बिचकुले यांच्या प्रवेशास विलंब होत आहे. कारण स्पर्धक अभिजीत बिचुकलेंमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहेत आणि आता त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी ने त्यांच्यासोबत ‘वीकेंड का वार’ एपिसोड देखील शूट केल्यामुळे,  त्या दोघी देखील क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यांची एंट्री पुढे ढकलण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले ?

अभिजित बिचकुले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहे.

कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.

आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्ष्यही वेधून घेतलंय. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. “2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार’ , ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’ , ‘कवी मनाचा नेता!’ अशी अनेक वक्त्यव्य अभिजित बिचकुले यांनी केलेली पाहायला मिळतात.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.