मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर हेही होते. पण दरेकर यांची भाजपने नियुक्ती केली आहे.
प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, सुजितसिंह ठाकूर यांची परिषदेत मुख्य प्रतोद, भाई गिरकर यांची उपनेते म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन केले. pic.twitter.com/Lf9wpyYnSu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2019
दरेकर हे पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आणि आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. मुंबई सहकारी बॅंकेचे ते अध्यक्षही आहेत. पक्षाची भूमिका माध्यमांसमोर आक्रमकरित्या मांडण्यासाठी ते ओळखले जातात. दरम्यान, भाजपने सुजितसिंह ठाकूर यांची मुख्य प्रतोदपदी तर उपनेतेपदी भाई गिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.