#CAB : ‘त्या’ ट्विटवरून अक्षय कुमारने मागितली अखेर माफी 

नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील हिंसक आंदोलनाने पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील राज्ये धुमसत आहेत. यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विधविध भागात आंदोलने सुरु आहेत.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शने झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले असून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

यावर एका ट्विटर युझरने वादग्रस्त ट्विट केले असून या ट्विटला बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने लाईक केले. यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच #BoycottCanadianKumar हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

यानंतर अखेर अक्षय कुमारने आपल्याकडून चुकून ट्विट लाईक झाल्याचे सांगितले असून माफी मागितली आहे. तसेच मी अशा कोणत्याही प्रकारला सपोर्ट करत नाही, असेही अक्षय कुमारने म्हंटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.