Prathamesh Parab : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाद्वारे सनी देओलने पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली. यानंतर आता बॉलीवूडच्या या सुपरस्टार अभिनेत्याची मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh parab) भेट घेतली आहे. सध्या त्याचे सनी देओलसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मागील काही दिवसांपासून प्रथमेशच्या लग्नाची चर्चा सुरू होती. यातच त्याने येत्या 14 फेब्रुवारीला साखरपुडा करणार असल्याची माहिती दिली. दुसरीकडे त्याचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा रिलीज होणार आहे. यानिमित्त प्रथमेश आणि त्याच्या सिनेमाच्या टीमने सनी देओलची भेट घेतली. या भेटीमध्ये सनीने प्रथमेशला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले होते.
View this post on Instagram
दरम्यान, मोहसीन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रथमेशसोबत पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे-पाटील हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाची निर्मिती डेव्हिड नादर यांनी केली आहे. प्रथमेश ‘टाइमपास’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झाला. यातील त्याच्या दगडू नावाच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.